हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – कोथरुड येथे दशभुजा गणपती मंदिराजवळ एका रिक्षावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत.आज ( शनिवार ) सकाळी 09.15 वाजता ही दुर्घटना घडली.अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोथरूड परिसरात दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर झाड पडून दुर्घटना झाली.या घटनेत रिक्षाचे मोठं नुकसान झाले आहे. 4 जण जखमी झाले आहेत.अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )