हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. त्यातच आता महत्त्वाची माहिती मिळते आहे. नवाब मलिक हे अजितदादांना पाठिंबा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.त्यामुळे शरद पवारांसाठी हा आणखी एक दणका समजला जात आहे.
मलिकांच्या सुटकेनंतर दोन्ही नेत्यांनी भेटी घेतल्या होत्या. नवाब मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. अजित पवार गटाने त्यांच्याकडे ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आता नवाब मलिक यांनीही त्यांना पाठिंबा दिल्यास एकूण ४२ आमदार त्यांच्या बाजूने होणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला हा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )