हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिन्ह आणि पक्षनावाबाबत सध्या निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही बाजूचे वकिल याबाबत जोरदार युक्तिवाद करतांना दिसत आहे. यातच शरद पवार गटातील खासदार मोहम्मद फैजल यांनी रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल केली आहे.यामुळे शरद पवारांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.२००९ मधल्या एका राजकीय खूनाच्या प्रकरणात मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात फैजल यांना सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठवली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. परंतु नंतर फैजल यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हाय कोर्टाने त्यांच्या शिक्षेवर तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर पीडितांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली.
मोहम्मद फैजल यांनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर या शिक्षेवर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना लोकसभेचं सदस्यस्व पुन्हा बहाल करण्यात आलं. परंतु यातच आता पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा हायकोर्टाकडे पाठवलं. त्यामुळे त्यांचं एकाच वर्षात दोन वेळा अपात्र ठरवण्याची वेळ आली आहे. केरळ हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने लोकसभा सचिवालयाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.दरम्यान, जानेवारीमध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनंतर आणि ऑक्टोबरमध्ये हायकोर्टाने दिलेल्या शिक्षानंतर मोहम्मद फैजल यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने अगदी दुसऱ्याच दिवशी अपात्र ठरवली. त्यानंतर सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरोधात फैजल यांनी अपील केल्यावर हायकोर्टाने काही काळासाठी स्थगिती दिली होती. पण तेव्हा खासदारकी बहाल करायला लोकसभा सचिवालयाने बराच वेळ लावला होती, बजेट सेशनमध्ये सुद्धा त्यांना बसू दिलं नव्हतं. यातच निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच पवारांचा लोकसभेतील एक खासदार कमी झाला होती पण आजच्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने पुन्हा चार विरूद्ध एक अशी स्थिती झाली आहे.
== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )