हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ‘एकनाथ शिंदे यांना जाणून बुजून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद दिलं गेलं’, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केला. ते म्हणाले आहेत की, ”नक्षलवाद्यांकडून ज्या वेळी धमक्या आल्या, तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवली जात असताना मातोश्रीहून सुरक्षा न पुरवण्यासाठी फोन आला.” मातोश्रीहून हा फोन ठाकरेंनीच केल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
ठाकरे कोणासोबतही घाट करू शकतात: ‘
‘उद्धव ठाकरे हे कोणासोबतही घाट करू शकतात. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार बनवलं.” ते म्हणाले, ”स्वतःच्या स्वार्थसाठी मुख्यमंत्री झाले. इतका मोठा घाट ते भाजपसोबत करू शकतात, तर त्यांना एकनाथ शिंदे यांना बळी देण्यासही वेळ लागला नसता.” — रवी राणा अपक्ष आमदार
‘संजय गायकवाड यांचे आरोप खोटे’
यातच ठाकरे गटाचे नेते आमशा पाडवी यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मी सुद्धा एक जिल्हा प्रमुख होतो. त्यावेळी आम्ही शिंदे यांच्याकडे जायचो. कारण त्यावेळी सगळ्या जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या माणसाला ठाकरे असं घातपात करतील का, हे सगळे आरोप खोटे आहेत.”
==== हिंदजागर न्यूज, पुणे.