हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज हे त्यांच्या कीर्तन शैलीमुळे महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्याच कीर्तनातील एका वक्तव्याने ते अडचणीत आले होते.अपत्यप्राप्तीच्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होत.हे वक्तव्यच त्यांच्या अंगलट आलं आहे. या प्रकरणी दाखल प्रकरणात आता त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये हा खटला दाखल करण्यात आलेलाअसून याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. १३) त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव ऍड. रंजना पगार गवांदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सविस्तर माहिती अशी :
अपत्यप्राप्ती बाबत वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार दिलेली होती. याची शहानिशा करत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी न्यायालयात फिर्याद दाखल करा असे आदेशही दिले.यानुसार घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात फिर्याद दिली.इंदूरकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत येथील अतिरिक्त सहजिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला रद्द करण्याची मागणी केली होती. हा खटला इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल लागला.
त्यानंतर ॲड . गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये ऍड. गवांदे यांच्या बाजूने निकाल लागला या निर्णयाविरोधात इंदोरीकर महाराज सर्वोच्च न्यायालयात गेले. पण तेथे इंदोरीकर महाराजांच्या विरोधात निकाल लागला. त्यांसुर सर्वोच्च न्यायालयाने संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. आता पुन्हा एकदा या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे अशी माहिती ऍड. गवांदे यांनी दिली.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )