हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे.दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ न्यूझीलंडनंतर विजयी हॅटट्रिक करण्यासाठी तयार आहे. मात्र एका टीमचचं हे स्वप्न पूर्ण होईल. मात्र सामना हा रंगतदार आणि चुरशीचा होणार इतकं मात्र नक्कीच. हा सामना कधी सुरु होईल, सामना फुकटात टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कधी व कुठे याबाबतची सर्व माहिती
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे खेळवण्यात येणार?टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार?टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे.टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
=== हिंदजागर टीम स्पेशल रिपोर्ट