हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यात एकीकडे ससून ड्रग्ज प्रकरण सुरु असतानाच कस्टम विभागाने पुणे रेल्वे स्टेशनवर मोठी कारवाई केली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरुन 90 किलो गांजा जप्त केला आहे.या गांजाची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे. कोणार्क एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याच एक्सप्रेसमधून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. ओडीसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी सुरु असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे कस्टम विभागाकडून दोन आरोपींनादेखील अटक करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी सुरु असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यांनी पुणे स्टेशनवर सापळा रचला होता. त्यानुसार कोणार्क एक्सप्रेस पुण्यात दाखल होताच कस्टम विभागाने धडाधड कारवाईला सुरुवात केली. यात तब्बल 27 लाख रुपयांचा गांजा जप्त केला.
तस्करांवर कस्टम विभागाची करडी नजर
सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि जांगाची तस्करी होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. त्यात आतापर्यंत लाखो रुपयांचा गांजा पुणे शहरात जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस,रेल्वे पोलीस आणि कस्टम या विभागांची यांची तस्करांवर करडी नजर असल्याचं कारवायांमधून दिसून येत आहे.
— गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )