हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – येरवड्याची जागा बिल्डरला देण्यास नकार दिल्यानंतर CID प्रमुखपदाची पोस्टिंग मला नाकारण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध असल्याने आम्हाला आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.असं म्हणत माजी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.मीरा बोरवणकर यांनी नुकतचं मॅडम कमिशनर या पुस्तकाचं अनावरण केलं आहे. या पुस्तकात अनेक धक्कायक गोष्टी समोर येत आहेत. पुस्तकात ३८ चॅप्टर असून यामध्ये येरवडा पोलिसांच्या जमीन लिलााबाबत सांगण्यात आलं आहे. पुण्याच्या येरवडा तुरूंगाजवळील पोलीस दलाच्य ताब्यातील तीन एकराच्या मोक्याच्या जागेचा तत्कालीन दादा पालकमंत्र्यांच्या वतीने लिलाव करण्यात आला. या लिलावाप्रमाणे या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मला पालकमंत्र्यांनी सांगितले होते. असं मीरा बोरवणकर यांनी सांगत अजित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
अजित पवारांनी जागा हस्तांतरित करण्यास मला सांगितलं पण मी नकार दिला. हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर तुम्ही जागा द्या, असं मला अजिदादांनी सांगितलं. जागा देण्यास मी नकार दिला. बोरवणकरांनी अजितदादांवर थेट आरोप केला आहे. माझ्यामुळे येरवड्याची जागा वाचली अन्यथा बिल्डरला गेली असती. शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच. असंही मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाचं अनावरण आहे. या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतची कारकिर्द मांडली असून यात ३८ चॅप्टर आहेत. त्यात त्यांनी येरवडा पोलिसांच्या जमीन लिलावाबाबतही सांगितलं आहे. त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. एक बिल्डर तुमच्याकडे येतो आणि तो सांगतो की जागा इथे आणि काही जागा तिथे आहे. मध्ये तुमचं पोलीस स्टेशन पडतं. तो शासनाला विनंती करतो तुम्ही तुमचं पोलीस स्टेशन हटवा आणि ही जागा मला द्या. मी तेव्हा पुणे पोलिस कमिनशर होते. आमचं म्हणणं असं होतं की पोलिसांच्या जागा त्याला देऊ नका. असंही त्या म्हणाल्या.
== गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )