हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – शहरातील नवले पुलावर अपघातचे सत्र सुरूच आहे. या ठिकाणी आठवडभारतून किमान दोन तीन भीषण अपघात घडतच आहेत.काल रात्री या ठिकाणी पुन्हा एक भीषण जीवघेणा अपघात घडला. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला, या भीषण आगीत ट्रकच्या केबीनमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.हा भीषण अपघात स्वामी नाराण मंदिराजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. मुंबईच्या दिशेने निघालेला हा ट्रक स्वामी नारायण मंदिराजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटनेरवर धडकला. यामुळे कंटेनर रस्त्यावर उलटला. तर ट्रक मध्ये मक्याचा भूसा असल्याने ट्रकने तत्काळ पेट घेतला. क्षणार्धात आगीने भीषण रूप धारण केले आणि ट्रकच्या केबिनमधील चार जणांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली गेली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या भीषण अपघातमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली होती.
== गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )