हिंदजागर,न्यूज प्रतिनिधी – नातेवाईक असलेल्या बहिणीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना पुण्यातील धायरी येथे घडली. यानंतर आरोपीने मारेकऱ्याचा शोध घेण्याच्या बहाण्याने पोलिसांसबत फिरत होता.खुन करून पुरवा नष्ट करणार्या व नंतर पोलिसांबरोबरच शोधाशोध करत फिरणार्या आरोपीला अखेर सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.संतोष तानाजी खाडे (वय १९, रा. कांबळे चाळ, विजयनगर, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर विठ्ठल वसंत नवघने (वय ५०, रा. जानकी पार्क, पोकळे वस्ती, धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार धायरी येथील खंडोबा माळ येथे मंगळवारी रात्री अकरा वाजता घडला. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष खाडे हा फ्रॅब्रिकेशनची कामे करतो तर खून करण्यात आलेले विठ्ठल नवघणे हे पुठ्ठ्याच्या कंपनीत कामाला होते. खाडे याच्या मानलेल्या नातेवाईक महिलेशी नवघने यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय खाडे याला होता. यामुळे त्याला त्याचा राग होता. या रागातूनच त्याने नावघेने याचा खून करण्याचे ठरवले.त्याने खुनाचा कट रचला. ओळखीचा फायदा घेऊन खाडे हा नवघणे यांना मंगळवारी रात्री धायरी येथील खंडोबा माळ येथे घेऊन गेला. तेथे दोघांनी दारू प्यायली. दरम्यान, आरोपीने नवघने याला महिलेशी असलेल्या संबंधावरून जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून खाडे याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार हत्यारांनी त्याचा खून केला. या खुनाच्या घटनेनंतर खाडे याने खंडोबा माळ परिसरात असलेल्या एका खोलीत मृतदेह फेकून दिला. त्यानंतर खाडे खंडोबा माळ उतरून खाली आला. परंतु, पती घरी न आल्याने नवघनेंची पत्नी विचारपुस करण्यासाठी आली असता, त्याने त्यांना नवघणेचा अपघात झाला असून मीच त्यांना घराजवळ सोडल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासानंतर गुन्हा उघड झाला..
आपघातामुळे खाडे याने शर्टाला रक्ताचा डाग लागल्याचा बनाव केला. त्यानंतर पोलिसांत याबाबत तक्रार दिली. तसेच आरोपीने पोलिसांबरोबरच नवघने याचा शोध घेण्याचा बहाणा केला. परंतु, पोलिसांच्या संशयी नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याची नशा उतरल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने पोलिसांना खुन केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने खंडोबा माळ येथे त्या खोलीत टाकलेला मृतदेह दाखविला.या बाबत सिहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन म्हणाले, आम्हाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही खाडे याच्याकडे नवघनेची चौकशी करत होतो. त्याने नवघणेचा अपघात झाल्याचा बनाव केला. तसेच त्याला घराजवळ सोडल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशीनंतर त्यानेच गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच लपवून ठेवलेला मृतदेह दाखविला. तसेच खुन केल्याचे कारणही स्पष्ट केले.
== गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )