हिंदजागर न्यूस प्रतिनिधी – हिंदजागर न्यूस प्रतिनिधी – महिलेने फिर्य़ादी यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर घरच्यांना सांगण्याची धमकी दिली. दरम्यान, महिलेचा दाजी तेजेंद्र त्रिपाठी याने प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या मोबाईलमधील फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर तिचा पती आणि दाजी त्रिपाठी यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे मागितले.महिलेने गेल्या वर्षभरात फिर्य़ादी यांच्याकडून 8 लाख 39 हजार रुपये उकलळे आहेत.त्यानंतरही तिने आणखी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.यानंतर पुन्हा 10 लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली.याप्रकरणी पती-पत्नीसह तिघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला आहे.
तसेच बहु चर्चित ड्रग माफिया ललित पाटील याला पोलिसांनी मदत केली या कारणामुळे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे काही पोलिस कर्मचारी यांना निलंबित केले असेल, पिंपरी चिंचवड ताथवडे गॅस स्फोट प्रकरणात २ अधिकारी व 3 कर्मचारी यांचा निलंबन असेल आणि ड्रीम इलेव्हनवर करोडपती झालेल्या PSI झेंडेंना यांच्या निलंबनाचे प्रकरण ताजे असतानाच सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस उप.निरीक्षक श्री.निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हा दाखल न होण्यासाठी मध्यस्थी केल्याचा आरोप केला आहे !!!महिलेकडून वारंवार होत असलेली पैशांची मागणी आणि तिच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गणेश माने यांनी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होत्या.. अशातच सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस उप.निरीक्षक श्री.निंबाळकर यांनी श्री.गणेश माने यांना कोणाच्या सांगण्यावरून व कोणत्या अधिकाराने सदर प्रकरण मिटवण्यासाठी वारंवार फोन करीत होते ??? त्यांना या प्रकरणाबाबत माहिती कोणी पुरवली ???? तसेच सदर अर्ज हा चौकशीसाठी अर्ज सुद्धा नसताना श्री. निंबाळकर यांना मग या प्रकरणात इतका रस का ??? याबाबतचा आरोप व जबाब श्री.माने यांनी दिनांक – १७ /१०/२०२३ रोजी सिंहगड पोलीस स्टेशन चे पी.एस.आय श्री.निंबाळकर हे प्रकरण मिटवण्यासाठी फोन करीत होते असे सोनाली मिठारे पोलीस उप.निरीक्षक भारती विद्यापीठ ,पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्याकडे नोंदवला आहे. सध्याच्या स्थितीला सदर गुन्हा हा तपासासाठी ए.पी.आय पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. श्री. माने यांनी दिलेल्या जबाबा नुसार उप.निरीक्षक निंबाळकर यांनी प्रकरण मिटवण्याची भूमिका का घेतली जात होती तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मध्यस्थी का करत होते ?? सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी घेतलेली भूमिका ही पोलिस अधिकाऱ्याची होती की मध्यस्थी करणाऱ्या दलालाची यामुळे सिंहगड पोलीस स्टेशन कडील उप.निरीक्षक निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ?? दरम्यान, आरोपी महिलेने गणेश माने यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच संबंध ठेवतानाचे फोटो काढले. हे फोटो दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांनी आपल्या मोबाईल मध्ये घेऊन ते फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गणेश माने आणि दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय पाटील करीत आहेत.
== गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )