हिंदजागर न्यूस प्रतिनिधी – या परिसरा मधील अनधिकृत बांधकामाबाबत सर्वात पहिला प्रश्न हा हिंदजागर न्यूज ने उचलला होता जर त्या वेळेस म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास तत्परता दाखवली असती तर कदाचित आज हा अपघात होता वाचला असता !!! पूरग्रस्त वसाहत गोखलेनगर येथे अनाधिकृत बांधकामाचे स्लॅब कोसळून कामगार देवराम विडेकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.संबंधित बांधकाम अनाधिकृत असून धोकादायक असल्याचे पत्र महापालिका बांधकाम विभाग झोन ६, यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी जून महिन्यात पत्र द्वारे कळवले होते.. तरी देखील, संबंधित बांधकाम विभागाने याकडे कानाडोळा केल्याने आज स्लॅब कोसळल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
‘आमच्याकडे तक्रारी अर्ज आला होता, परंतु संबंधित जागा म्हाडाकडे येत असल्याने आम्ही, त्यांच्याकडे अर्ज पाठवला होता. सध्या संबंधित इमारतीचे धोकादायक बांधकाम पाडण्याचे काम सुरू आहे. आम्ही म्हाडाकडे अर्ज देऊन देखील म्हाडाचे अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. संदीप कदम (उपअभियंता, झोन ६, बांधकाम विभाग )
‘रहिवासी व म्हाडा यांचा जागेचा करार संपला की, आम्ही बांधकाम तपासणीसाठी जात असतो. अनाधिकृत बांधकाम असेल तर तसे वरिष्ठांना कळवतो. संबंधित बांधकाम अनाधिकृत असल्याचे तसे वरिष्ठांना कळवले आहे. अनाधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही.- विशाल किर्दत, कनिष्ठ अभियंता म्हाडा.
- गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )