हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – गर्लफ्रेन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या दोघा सराईतांना ताब्यात घेण्यात, भारती विद्यापीठ पोलीसांना यश मिळाले असून अर्जुन महादेव शेलार, (वय १८ वर्षे ६ महीने, रा.मु.पो भिवरी, ना.पुरंदर, जि. पुणे) प्रेम राजु शेलार, (वय २० वर्षे, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे कडून दोन लाख किंमतीचे पंधरा मोबाईल जप्त करण्यात आले.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खरगोई यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, कात्रज तलाव येथे दोन चोरीचे मोबाईल फोन विक्री करता आले आहेत. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अर्जुन महादेव शेलार, व प्रेम राजु शेलार, यांच्या ताब्यातील पिशवी तपासली असता त्यामध्ये मोबाईल मिळून आले. त्या मोबाईल फोनबाबत आरोपीतांकडे तपास करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन हे कात्रज, गोकुळनर, कोंढवा भागातुन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामधील एक मोबाईल फोन हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील असून उर्वरीत १४ मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे. आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्या साठी चोरी केले असल्याचे सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक( , अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक , पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर , सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ , पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता , पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे यांच्या पथकाने केली.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )