हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने शिवाजीनगर परिसरातील आपटे रास्ता, घोले रस्ता, देशमुख पथ येथे जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये १३ हाॅटेलवर कारवाई करून फ्रंट मार्जिन, रेअर मार्जिन, साईड मार्जिनवर कारवाई करण्यात आली.त्यामध्ये नऊ हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. यामध्ये एका हॉटेलच्या ५ हजार ८०० चौरस फुटचा समावेश आहे. या कारवाईमध्ये बांबू, पत्रा, लोखंडी अँगल , ओनिग ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड, ई. चा समावेश आहे. यानंतर पुन्हा विनापरवाना शेड उभारल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुनिल कदम यांनी दिला आहे.
तसेच सेनापती बापट रोड , मॉडेल कॉलनी येथे सुद्धा पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाने कारवाई केली पण या कारवाईमध्ये सुद्धा निवडक हॉटेल्स वरतीच कारवाई झाली स्विग हॉटेल व जेडब्ल्यू मेरिट समोरील नव्याने सुरू झालेले R.K Hotel नागरिकांनी तक्रारी अर्ज करून सुद्धा यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते यामध्ये कुठला राजकीय अदृश्य हात असल्याचा बोलले जात आहे आता यानंतर बघूया पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास विभाग येथील झोन क्रमांक – ६ चे अधिकारी यावरती कारवाई करतात का नाही ..
. बिपिन शिंदे (कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग,कार्यकारी अभियंता झोन – ६ ), यांचे मार्गदर्शन खाली सुनील कदम ( उप.अभियंता, बांधकाम विकास विभाग,कार्यकारी अभियंता झोन – ६ ), राहुल रसाळे ( (शाखा अभियंता, बांधकाम विकास विभाग,कार्यकारी अभियंता झोन – ६ ), ),यांनी एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.या नंतर पुन्हा विनापरवाना शेड उभारल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुनिल कदम यांनी दिला आहे