हिंदजागर न्यूज पुणे – अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासह सदस्यपदाच्या एकूण १३ जागांपैकी ११ जागा जिंकून राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे सरपंच पदी सारिका रत्नाकर हिंगे या विजय झाल्या आहे.मागील पंचवार्षिकला शिवसेनेचे पाच सदस्य होते यावेळी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले भाजपने पहिल्यांदाच एक जागा जिंकली आहे.
हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून –https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0ब
सदस्यपदाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कंसात पक्ष वार्ड क्रमांक १ – चंद्रकांत खंडू गुनगे (राष्ट्रवादी), मनीषा भरत हिंगे (राष्ट्रवादी), गीता प्रदीप टाव्हरे(राष्ट्रवादी), वार्ड क्रमांक २ – उमेदवार संजय जयसिंग हिंगे (राष्ट्रवादी), प्रकाश रामचंद्र जाधव (राष्ट्रवादी), इंदुबाई मार्तंड हिले (राष्ट्रवादी- बिनविरोध), वार्ड क्रमांक ३ – दिपा कुणाल दळवी (राष्ट्रवादी), प्रशांत भास्कर वाडेकर (राष्ट्रवादी) , वार्ड क्रमांक ४ – कविता विकास हिंगे (राष्ट्रवादी), अनील पांडुरंग हिंगे (राष्ट्रवादी), वार्ड क्रमांक ५ – चित्रा दीपक चवरे (राष्ट्रवादी), कल्पना संतोष हिंगे (भाजपा ), कल्याण हनुमंत हिंगे (शिवसेना शिंदे गट)
अवसरी बुद्रुक हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांचे गाव असून मागील अनेक वर्ष विष्णू काका हिंगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ग्रामपंचायतवर सत्ता आहे.येथील सरपंचपद महिला सर्वसाधारण साठी होते चार उमेदवार रिंगणात असल्याने चौरंगी लढत झाली यामध्ये राष्ट्रवादीच्या सारिका रत्नाकर हिंगे या (१२२७) मते घेऊन विजयी झाल्या तर पराभूत उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य कुमार हिंगे यांची सून संध्या सचिन हिंगे (९३६ ) शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक अजित चव्हाण यांची पत्नी स्मिता अजित चव्हाण(५९५) व शरद बँकेचे माजी संचालक संजय चव्हाण यांच्या पत्नी आशा संजय चव्हाण (४२२) या तीन उमेदवारांचा पराभव झाला.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे)