हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सिद्धिविनायक गणपती मंदिरच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदा सरवणकर यांच्या नियुक्तीचे राजपत्र सरकारने जारी केले आहे.याआधी आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ जुलै २०२३ मध्ये संपला होता.मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सरकारने जाहीर केलं. सदा सरवणकर यांची ६ नोव्हेंबर २०२३ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ २३ जुलै २०२३ रोजी संपुष्टात आला होता. याआधी २३ जुलै २०२३ रोजी आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवण्यात आला होता.
सिद्धिविनायक न्यासाचे अध्य़क्षपद हे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे आहे. विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आला असून अध्यक्षपदाची नियुक्ती सराकरने जाहीर केलीय. लवकरच कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. आदेश बांदेकर हे उबाठा शिवसेनेच सचिव आहेत. तर शिवसेनेत फुटीनंतर सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )