हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यातील बाणेर परिसरात एका कोरियन व्यक्तीच्या घरावर भल्या सकाळी गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली. गोळी बाल्कनीच्या काचेवर लागली आहे.यात कोणी जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबार हा चुकून झाला असण्याची शक्यता आहे.पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. घोरपडी पेठ, सिंहगड रोड याठीकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून —- https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b
औंध परिसरातील ऍलोमा काऊंती या सोसायटीच्या परिसरामध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुखावर एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्या व्यक्तीला लागली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
घटनास्थळावर पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडली आहे. त्यानंतर तात्काळ न्यायवैधक प्रयोगशाळेच्याबॅलेस्टिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुनही गोळी नेमकी कोणत्या बंदुकीमधून झाडण्यात आली याचा अंदाज घेतला. गोळीबार झालेली व्यक्ती ही दास याबड्या कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाची प्रमुख आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.