हिंदजागर न्यूज,पुणे – बटाट्याचा पाला खाल्ल्याने गायींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरमधून समोर आला आहे. यामध्ये गीर जातीच्या २० गायींचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक गायींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेत राजस्थानी व्यावसायिकांचे १६ ते १७ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातीलदूध व्यावसायिकहिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांच्या मालकीच्या या गाई आहेत. बटाट्यावरील रासायनिक फवारणीआणि रोगराईमुळे गायींना विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पंचनामे केले आहेत.व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
- हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून —- https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b
निरगुडसर-मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले व्यावसायिक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १५० गाई, कालवडी, वासरे आहेत. गायी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.निरगुडसर गावात राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड मागील अनेक वर्षापासून वास्तव्यासआहेत. त्यांच्या १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत.निरगुडसर गावाच्या शेजारी असणाऱ्या थोरांदळे गावात बटाटा पिकाची काढणी सुरू होती. या शेतातील कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गाईंना विषबाधा झाली. ज्यामध्ये १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच ४० गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
— विनोद दत्तात्रय वाघमारे ( हिंदजागर न्यूज,पुणे )