हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी,पुणे – ब्रह्मदत्त विद्यालय,मानसिक दिव्यांग मुलामुलींचे, प्राधिकरण, निगडी,पुणे येथे पिंपरी चिंचवड भागातील मानसिक दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण व पुनर्वसन साठी 1989 पासून प्राधिकरण येथे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण बरोबरच कला,क्रीडा,नृत्य याचे ही शिक्षण दिले जाते.
शाळेतील विद्यार्थी जिल्हा, राज्य,राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वी होत असतात.शाळेत सध्या 30 विद्यार्थी विशेष शिक्षण घेत आहेत. हेंकल कंपनी तर्फे सीएसआर अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी पुनर्वसन दृष्टीने कौशल्य कार्यशाळा सुरू करण्यात आली असून 16 ते 18 वयोगटातील विद्यार्थी कपूर,उदबत्ती, कापसाच्या वाती तयार करणे,पिठाची गिरणी,शिलाई मशीन,इस्त्री करणे,वॉशिंग मशीन कपडे धुणे इत्यादी मशीन च्या सहाय्याने विविध वस्तू उत्पादन करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत.भविष्यात 18 वर्षा वरील.
मानसिक दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साठी भव्य कौशल्य कार्यशाळा विकसित करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. दिवाळी निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, कापसाच्या वती, मेण पणत्या,कापूर,धूप,उदबत्ती याचे प्रदर्शन व विक्री केंद्र *उदघाटन शाळेच्या माजी मुख्यध्यापीका श्रीमती अनिता पळशीकर व माजी शिपाई श्रीमती मंगला गायकवड यांच्या हस्ते करण्यात आले.* याप्रसंगी शाळेतील पालक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी विक्री केंद्रास पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री.रवींद्र जोशी यांनी दिली.
— विनोद दत्तात्रय वाघमारे ( हिंदजागर न्यूज,पुणे )