हिंदजागर न्यूज प्रतिनिधी ( भाग – १ ) – शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतुकीचे 15 रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आदर्शवत असे रस्ते तयार करण्याचे प्रशासनाने ध्येय ठेवले आहे त्यानुसार रस्ते अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई सध्या सुरू आहे.
प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेचे अधिकारी २ पद्धतीने अतिक्रमण कारवाया करतात एक बांधकाम विभाग आणि दुसरं म्हणजे अतिक्रमण विभाग पण यामध्ये खपलत अशी होती की फक्त मोठमोठे हॉटेल्स व दुकानदार यांच्यावरती सातत्याने जाणीवपूर्वक व हेतू पुरस्कृत कारवाई केली जाते. वेताळबाबा चौक ते कुसाळकर पुतळा चौक येथे अनेक ठिकाणी दुकानाच्या पुढील बाजूस मोठमोठे अनधिकृत शेड व बांधकाम करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकाम रस्त्यावर आल्याकारणाने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे परिसरातील आतील बाजूचा मेन रोड असल्याकारणाने तिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या होत आहे . या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई सध्या सुरू करणे गरजेचे आहे अशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात इच्छा आहे त्याबाबत नागरिकांनी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी सुद्धा केल्या आहेत. पण यांच्यातील एका दुकानदार हा बीजेपी या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठमोठ्या नेत्यांच्या नावाचा दबाव टाकून कारवाई करण्यापासून लांब ठेवत आहे. मग बीजेपी पक्षाची हीच पारदर्शकता का ??? सामान्य जनतेला एक न्याय आणि भाजपच्या कार्यकर्त्याला एक नाही असं का ?????
आज सुद्धा अतिक्रमण विभागाने दीप बंगला चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली पण कारवाई फक्त सामान्य जनतेवरच होती असल्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या दुकानासमोर बेकायदेशीर उभारलेल्या शेड वरती कारवाई का होत नाही ???:सध्याच्या स्थितीला देशात व राज्यांमध्ये भाजपाचे सरकार असल्या कारणाने अशा बेकायदेशीर दुकानदाराच्या शेडला पालिकेचे अधिकारी कारवाई करण्यास घाबरत आहे असं म्हणणं अवघड ठरणार नाही !!!! दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता मोकळा करण्यात यावं व नागरिकांची ट्रॅफिक समस्यातून मुक्ती करावी.
वेताळबाबा चौक ते कुसळकर पुतळा येथील अनधिकृत शेड, ओटे, फलक आणि दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे या सर्वांची माहिती घेऊन अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई करू.महापालिकेने रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे.श्री.रवी खंदारे सहाय्यक उपायुक्त,घोले रोड,क्षेत्रीय कार्यालय
जोपर्यंत वेताळबाबा ते कुसळकर पुतळ्या रस्ता मोकळा श्वास घेणार नाही तोपर्यंत हिंदजागर न्यूज या गोष्टीचा पाठपुरावा सातत्याने लावून धरून करणार.
.—- गणेश मारुती जोशी ( हिंद जागर न्यूज,पुणे )