हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे ( भाग- १ ) – जागतिक महामारी करोनाच्या काळामध्ये सन २०१८ ते २०२१ पर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण खंडाळा जिल्हा सातारा येथे शासनाच्या विविध शासकीय कामे जसे रोपे लागवड साठी लागणारे खड्डे खोदणे, खड्डे मातीने भरणे, रोप लागवड, निदान करणे ,रोपांना पाणी देणे ,संरक्षण व देखभाल करणे, रोपवाटिकातील विविध असे शासकीय विविध प्रकारची कामे करण्यात आली होती. करोणाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती खलवल्याने व परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात असणाऱ्या लोकांचाच या परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनीकरण खंडाळा यांनी लोकांची गरज ओळखून शासनाची दिशाभूल करण्याची योजना आखली व शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फाणूक कशी होईल हे योजले व त्यानंतर त्यांनी सदर योजना आखून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.याबाबत ज्यांच्या बरोबर या वनपरिषेक अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केली त्याबाबत त्यांनी आवाज उठवला असता त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दर महिन्याला १०० ते १२० इतकी लोक ही कामाला दाखवली व त्यानंतर दर महिन्याला त्यांच्या नावाने शासनामार्फत ४० हजार ते ६० हजाराचे चेक द्वारे पगार काढले, पगार काढल्यानंतर याच वन परिक्षेत्र अधिकारी ,सामाजिक वनीकरण खंडाळा यांनी लोकांकडून जातीने थांबून व जबरदस्तीने शासनाकडून चेक द्वारे आलेल्या आलेले पैसे हे कॅश स्वरूपात वसूल करीत होता आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची १० ते २० कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून येते !!! सदर कामाची शासनामार्फत ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच शासनाने वरिष्ठ अधिकारी नेमून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी व यात जो कोणी दोषी आहे त्यावरती त्वरित कारवाई करण्याची मागणी मा. प्रधान सचिव, वने मंत्रालय, मुंबई,मा.मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक, पुणे,मा.मुख्य वनसंरक्षक .सामाजिक वनीकरण ,सातारा,मा.वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, सातारा,मा.विभागीय वन अधिकारी, सातारा यांच्याकडे पुराव्यासहित ई-मेल द्वारे तक्रारी अर्ज करून केली आहे असे यातील तक्रारदार ही श्री.निलेश निकम यांनी सांगितले आहे.
याबाबत आम्ही त्या वेळेचे श्री.संतोष चव्हाण ,वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण खंडाळा परिषेत्र यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत कुठलीही प्रकारची प्रतिसाद दिली नाही तसेच सध्याचे कार्यरत असलेले श्री.महेश पाटील वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याशी संपर्क केल्या असता त्यांनी पुढील आठवड्यामध्ये आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले.
—— श्री.गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज ,पुणे )