हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुणे शहरात पुन्हा मोठा अपघाता झाला आहे. पुणे येथील जांभूळवाडी दरी पुलावर हा अपघात झाला. शनिवारी पहाटे चार वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचवेळी चार वाहने एकमेकांना धडकली.टेम्पो पिक अप, कंटेनर, बस अशा वाहनांचा अपघात झाला. या अपघातात २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली होती. उमेश हनुमंत वाघमारे या मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. यामुळे पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ थरकाप उडाला. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
हिंदजागर न्यूज च्या पुणे शहरातील लेटेस्ट अपडेट बातम्यांसाठी त्वरित आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा …
https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b
पुणे शहरात 63 ठिकाणी ब्लॉक स्पॉट
2020 नंतर पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण 113 टक्के वाढले आहे. यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे ‘ब्लॅकस्पॉट’ शोधण्यासाठी समिती तयार केली. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी होते. त्यांनी ज्या ठिकाणी वारंवार अपघात त्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर शहर आणि जिल्ह्यांत 63 ठिकाणांनी ब्लॉक स्पॉट असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथील नवले पूल आणि पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले.
अपघातानंतर तातडीने मदत कार्य पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. साताऱ्याकडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिली. पुणे जांभूळवाडी दरी पुलावर अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळतात तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळ्यांना जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले. सध्या महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे.
— प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज,पुणे )