हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.यावेळी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. अमित शाह आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आज दिल्लीला अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना डेंग्यू आजार झाल्याने ते कोणाचीही भेटीगाठी घेणं किंवा सक्रिय राजकरणात असणं टाळत होते. मात्र आज सकाळी अचानक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी शाह यांची भेट घेतली.
दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सुनावणी बाबत चर्चा झाली, असं सांगण्यात येत आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट.भेटतत्पूर्वी आज सकाळी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यात रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र आता वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेल्यानंतर अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा बदलणार का?
— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्यूज, पुणे )