हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुणे शहरात आगीच्या अनेक घटना घडल्या, संध्याकाळी सात ते राञी दहा या वेळेत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात फटाक्यांमुळे १५ आगीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोरील एका वाड्यात भीषण लागली.अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. रविवारी सायंकाळी साडेसातनंतर व्यापारी पेठेसह शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घराच्या छतावर साठलेला पाचोळा, तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडतात. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याच्या तक्रारी नोंदविल्या.रविवारी सायंकाळी साडेसात ते रात्री नऊपर्यंत पंधरा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.रास्ता पेठेतील के.ई.एम रुग्णालय, कोथरुडमधील सुतार दवाखान्याजवळ एका दुकानात आग लागली. वडारवाडी परिसरातील पांडवनगर पोलीस चौकी परिसरातील एका घरात आग लागल्याची घटना घडली.
कोंढवा बुद्रुक पोलीस चौकीसमोर साठलेल्या कचऱ्यावर ठिणगी पडून आग लागली. नाना पेठेतील चाचा हलवाई दुकानाजवळ एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. तसेच कोंंढव्यातील शिवनेरी परिसरातील घराच्या गच्चीवर आग लागली. वारजे भागातील आदित्य गार्डन सिटी सोसायटीतील सदनिकेत आग लागली.
— गणेश मारुती जोशी ( हिंदीजागार न्यूज, पुणे )