हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – एकीकडे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने त्यावर विविध उपाययोजले जात आहेत, तर दुसरीकडे विकासाच्या नावावर संपूर्ण छत्रपती शिवाजीनगर परिसर येथे झाडांची सर्रास कायदेशीर व बेकायदेशीर कत्तल सुरू आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा नारा सरकार मार्फत दिला असताना विकास नमक व्यक्ती ( स्वतःला पुणे महानगरपालिकेचा ठेकेदार संबोधतो ) हा संपूर्ण छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदा झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करीत आहे या मनमानी बेकायदा वृक्षतोड करीत असल्याने नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे.
नियमानुसार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेऊनच नागरिकांना झाडे कापण्याची परवानगी मिळत असते तसेच जर एखाद्या झाड पूर्णपणे काढायचं असेल तर त्याबाबत कायदेशीर नोटीस व पेपरला जाहिरात द्यावी लागते यात मोठी प्रक्रिया करावी लागते आणि यालाच दुसरा पर्याय म्हणजे विकास नामक व्यक्तीला संपर्क करायचा 1 झाडाला 10 ते 15 हजार रुपये घेऊन मग तुमची झाडे कितीही असो दुसऱ्या दिवशी काम चालू. हा व्यक्ती पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रकारचा ठेकेदार नाही अथवा पुणे महानगरपालिका उद्यान विभागात रेकॉर्ड वरती सुद्धा नाही तरीसुद्धा छत्रपती शिवाजीनगर मध्ये यालाच झाडे छाटण्याचे व तोडण्याचे काम देण्याचा आग्रह उद्यान विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा व मा.वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांचा असतो. याबाबत नागरिकांनी स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी अनेक वेळा पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे या विकासनामक व्यक्तीच्या बाबत तक्रारी केल्या पण पुणे महानगरपालिकेचे अधिकारी त्यावरती कारवाई करण्यास नेहमीच असमर्थ ठरले.
हा विकास नमक व्यक्ती आमच्या पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कुठल्याही रेकॉर्ड वरती उपलब्ध नाही. तो पुणे महानगरपालिका उद्यान विभागाचा ठेकेदार नाही त्याचा पालिकेशी कुठलाही प्रकारचा संबंध नाही. आणि जर तो पुणे महानगरपालिकेचे नाव वापरून काम करत असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. पुणे महानगरपालिकेच्या नियमा मध्ये कुणालाही असे बंधनकारक नाही की याच्या कडूनच काम करून घेतले पाहिजे याच्यासारखे अनेक लोक प्रायव्हेट काम करणारी आहेत आपण त्यांच्याकडून करून घेतले तरी काही हरकत नाही. सोमवारी याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे स्पष्टपणे श्री.घोरपडे,उद्यान अधीक्षक,पुणे महानगरपालिका यांनी सांगितले.
अलीकडेच या विकासनामक व्यक्तीने मागील तीन महिन्यात अंदाजे पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता 15 गुलमोहराची झाडे , 12 रेन ट्री, 25 ते 28 सुबबूल, 8 नारळाची झाडे , 7 आंब्याची झाडे व पेरू, चिकू अशी अनेक प्रकारची झाडे बिना परवानगी काढली आहेत पालिका प्रशासन यावरती शांत बसले आहे.पुणे महानगरपालिकेचे महसूल बुडवून या विकास नमक व्यक्तीला महसूल कमुन देण्यास कुणाचा फायदा आहे ???
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )