..
हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीप प्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. त्याच्या जितक्या प्रथा, तितक्या परंपरा दिवाळी एक प्राचीन उत्सव आहे.आज जनवाडी येथील नवनाथ मित्र मंडळ, ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यंदाच्या वर्षी मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेला केंद्रस्थान ठेवून आकर्षक फुलांची सजावट केली. मंदिरामध्ये १००१ दिव्यांचे दीप प्रलोजन करण्यात आले होते अशी माहिती ही नवनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे संपर्क प्रमुख श्री.स्वप्नील रवींद्र जोशी यांनी दिली.
अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून, हा दीपोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे, महाभारत काळात श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासीयांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज पुणे )