हिंदजागर न्यूजेवण प्रतिनिधी, पुणे – दुचाकीवर लिफ्ट देणे तरूणाला चांगलेच महागात पडले असून, लिफ्ट दिलेल्या व्यक्तीने मी आत्ताच एकाला मारून आलो आहे, मला पैसे दे नाहीतर मी तुला पण मारीन असे धमकावत एक हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.विशाल कांबळे (वय २४, रा. वेताळनगर रोड, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत उमेश बाळासाहेत सोनवणे (वय ३३, रा. अरिहंत रेसीडेन्सी, आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे.
विनायक गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमाारास सोनवणे हे वडगाव पुलावरून जात होते. तेव्हा विशाल कांबळे याने त्यांच्या दुचाकीला लिफ्ट मागितली. सोनवणे यांनी मानुसकी दाखवत विशालला लिफ्ट दिली. मात्र याचा गैर फायदा घेत विशालने मी एकाला मारून आलो, म्हणत जबरदस्तीने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान स्प्रिंग फिल्ड सोसायटीच्या गेटमधुन आत जात असताना आरोपीने त्याच्या हातात लाकडी फळी घेवुन सोनवणे यांना मारहाण करण्याची धमकी देत त्यांच्या खिशातून एक हजार जबरस्तीन काढुन घेतले. यावेळी जमलेले लोक मदतीला पुढे आले असता त्यांनाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली.