हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन दरी पुलाजवळ थांबलेल्या एका ३१ वर्षीय गवंड्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अलगद जाळ्यात पकडले .भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार चेतन गोरे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली .माहितीची खात्री करुन तपास पथकाने जांभुळवाडी दरीपुल परिसरात आरोपीचा शोध घेतला. पथकाने विजयकुमार शिंदे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे गावठी कट्टा व एक काडतुस आढळून आले. पोलिसांनी गावठी कट्टा व काडतुस जप्त केले आहे.
विजयकुमार तुळशीराम शिंदे (वय-31 रा. भुगाव, माळवाडी फाटा, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.सदर आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५३/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे , प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
— गणेश मारुती जोशी (हिंदीजागार न्यूज, पुणे )