हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – पुण्यात पुणे नगर मार्गावर वडगाव शेरी येथे भीषण अपघात झाला आहे. रिलायन्स कंपणीचा गॅस वाहतूक करणारा टँकर पहाटे ३ च्या सुमारास वडगाव शेरी चौकात पलटी झाला आहे.या मुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू आहे. ही गळती थांबवण्यासाठी अग्निशामक दलाचे ८ बंब आग लागू नये म्हणून पलटी झालेल्या टँकरवर पाण्याचा मारा करत आहेत. या अपघातामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियंत्रण करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत रिलायन्स कंपनीचा वायु वाहतूक करणारा एक टँकर जात होता. या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात इथेलिन ऑक्ससाईड वायूची वाहतुकी केली जात होती.दरम्यान, हा टँकर रात्री ३ च्या सुमारास वडगाव शेरी चौकात
दरम्यान, हा टँकर रात्री ३ च्या सुमारास वडगाव शेरी चौकात आला असता. टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने मोठ्या प्रमाणात वायु गळती होण्यास सुरुवात झाली. या गळती मुळे रस्त्यावर पूर्ण गॅस पसरला होता. ही गॅस ज्वलनशील असल्याने मोठ्या स्फोट होण्याची भीती होती. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तब्बल ८ बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले.रिलायंस पेट्रोकैमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारणे सुरु आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिस विभागातर्फे या मार्गावरील वाहतुक नियंञित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वृत्त लिहोत्सव गॅस गळती ही थांबलेली नव्हती. तसेच कंपनीचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )