हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे खोदकाम सुरू असताना बाणेर परिसरात जुना जिवंत हातबाँम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. मेट्रो मार्गाचे खांब उभे करण्याचे काम सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.जिवंत हातबाँम्ब ब्रिटीशकालीन असण्याची शक्यता आहे. दरम्यान, माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे व त्यांचे सहकारी तसेच बाँम्ब शोधक व नाशक पथकाने येथे धाव घेतली. हा हातबॉम्ब बीडीडीएस पथकाने उडवून देत तो नष्ट केला आहे.
याप्रकरणाची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबाँम्ब (हँड ग्रेनेड) सापडले. मेट्रो कामगारांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी येथे धाव घेतली.पोलिसांनी त्वरित बाँम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. बाँम्ब शोधक नाशक पथकाने तातडीने बाँम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले. बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यात आली. तेव्हा तो जिवंत असल्याचे समोर आले. त्यानुसार, बीडीडीएसने बाँम्ब सुरक्षितस्थळी हलवून निकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली. काही वेळातच हा बॉम्ब उडवून देत नष्ट करण्यात आला. हातबाँम्ब ब्रिटीशकालीन असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बालाजी पांढरे यांनी दिली
बाणेरसारख्या उच्चभ्रू परिसरात हातबॉम्ब सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. बीडीडीएस पथक तसेच स्थानिक पोलीस दाखल झाल्यानंतर बघ्यांचीदेखील मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी मोकळ्या भागात नेऊन हा बाँम्ब निकामी करण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी पोलिसांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेत तेव्हा परिसरातील वाहतूकदेखील थांबवली होती. बाँम्ब उडविल्यानंतर मोठा आवाज झाला.
— श्री.प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज, पुणे )