हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – दि.०५/१२/२०२३ रोजी पोलीस हवालदार बंदु गिरे पोलीस स्टेशन मध्ये हजर असताना त्यांच्या बातमी दाराकडून बातमी मिळाली की, पुणे शहर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल सोबत बाळगत डांगे चौक येथे कामानिमीत्त येणार आहे.घटनेची माहीती देवुन त्यांचे परवानगीने छापा कारवाई करणेकरीता सोबतचे स्टाफसह डांगे चौक येथे जावुन सापळा कारवाई करुन थांबले असता मिळाले बातमी प्रमाणे एक इसम ज्याचे खांदयावर काळे रंगाची सॅक असलेला तेथे आला त्याची हालचाल संशयीत वाटल्याने लागलीच पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्याने स्वतःचे नाव विशाल ऊर्फ रावण सिध्दु बनसोडे वय २५ वर्षे रा. लमाणवस्ती, पीडीसी बँकेचे मागे, खडकवासला ता.हवेली जि. पुणे सांगीतले त्याचे ताब्यातील सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०२ जिवंत काडतुस (राऊंड) असे मिळुन आले.
सदर बाबत पोहवा. वंदु गिरे यांनी दिले फिर्यादी वरुन वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ११६५ / २०२३ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन आरोपीस अटक केली आहे. आरोपीची दिनांक ०८ / १२ / २०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे. आरोपी वर यापुर्वी हवेली पो.स्टे जि. पुणे ग्रामीण गु. रजि. नं. ७३ / २०२२ भादविक ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ४२७, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा . प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना प्रशांत गिलबीले, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. काँतेय खराडे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, यांनी मिळुन केली आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे )