हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – पुणे महापालिका हद्दीतील नगर रोडवरील बीआरटीमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बीआरटी हटविण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला प्रतिसाद देत महापालिकेने बीआरटी हटविण्यास सुरुवात केली आहे.
नगर रोडवर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.त्यातूनच अनेकदा अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील शिल्लक असलेले बीआरटी मार्ग काढून टाकावा अशी मागणी सातत्याने होत होती.त्यासाठी पुणे महापालिकेने गोखले इन्स्टिट्यूटची अहवालासाठी नियुक्ती केली होती. त्यावर गोखले इन्स्टिट्यूटने पुणे-नगर महामार्गावरील पर्णकुटी, येरवडा ते फिनिक्स मॉल, विमाननगर या टप्प्यातील मेट्रो कामामुळे बंद पडलेल्या बीआरटी काढण्याचा अहवाल महापालिकेला दिला.त्यामुळे महापालिकेने मध्यरात्री बीआरटी उघडून टाकली. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
— गणेश मारुती जोशी (हिंदीजागार न्युज,पुणे )