हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बोपोडी पोलीस चौकीत आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले.बोपोडी पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे उदघाटन आमदार शिरोळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
बोपोडीतील कायदा, सुव्यवस्था लक्षात घेऊन, या ठिकाणी पोलीस चौकी करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात सरकारकडे करण्यात आली होती, त्या मागणीला यश आले आहे. चौकीतील यंत्रणा लवकरच अत्याधुनिक केली जाईल असे, आमदार शिरोळे यांनी यावेळी सांगितले. तसेच ह्या अनुषंगाने चौकीला लवकरात लवकर आमदार निधी मधून संगणक पुरवले जातील असे आमदार शिरोळे यांनी सांगितले
या प्रसंगी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, पोलिस निरीक्षक सहाणे, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, प्रकाश ढोरे, सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, अनिल भिसे, अभिजित गायकवाड, मुकेश गवळी, धर्मेश शहा, संजय कांबळे, सुभाष पाडळे, रोहीत भिसे, गणेश स्वामी, सुप्रीम चोंधे, मयुरेश गायकवाड, अजित पवार, अनिल तीळवणकर, गणेश नायकरे, संकेत कांबळे, अभिषेक चव्हाण, अनिकेत भिसे, मनीषा कांबळे, शुभम आयने, सिद्धांत जगताप, अकबर शेख आदि उपस्थित होते.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्युज, पुणे )