हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुणे लोकसभा निवडणूक (Pune)काही महिन्यांवर आली आहे. त्यादृष्टीने मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पुण्यातील 8 विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत वसंत मोरे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे.पक्ष बांधणीवर चर्चा झाली. पक्ष बांधणीवर (Pune)यावेळी जोर देण्यात आला. 8 विधानसभा मतदारसंघांच्या अध्यकक्षांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे यांची वन टू वन चर्चा झाली. आपण शहराध्यक्ष असताना केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. 2012 ला नगरसेवकांना झालेले मतदान, याची कल्पना देण्यात आल्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतरही सहा महिन्यांत निवडणूक का घेतली नाही, असा सवाल करत उच्च न्यायालयाने याप्रकरणी निवडणूक आयोगाला जाब विचारला.पोटनिवडणूक का घेतली नाही याची समाधानकारक माहिती सोमवारपर्यंत दिली नाही तर, दिनांक ११ डिसेंबर रोजी योग्य ते आदेश देऊ, असे आयोगाला ठणकावले आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज प्रतिनिधी )