हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,,पुणे – पुणे-खुनाच्या प्रयत्नातील गुन्हयात दोन महिन्या पासुन फरार असलेला सराईत गुंड सनी शंकर जाधव वय २६ वर्षे रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर १०, माताजी सुपर मार्केट शेजारी अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी याला पोलिसांनी जेरबंद केले आहे .या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२५/१०/२०२३ रोजी बालाजीनगर येथील शिळीमकर पेट्रोल पंप जवळ फिर्यादी रा.अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन भांडणात मध्यस्थी करतोस काय, जास्त शहाणा झालास का, याला मारून टाकू, याला आता संपवायचाच असे असे बोलून बबलू कोठारी, सल्या शेख सनी जाधव यांनी संगनमत करुन जिवे मारण्याच्या हेतुन कोयत्याने वार केले व हातातील कोयते, बांबू हवेत फिरवून आजूबाजूच्या लोकांसमोर आम्हीच इथले भाई आहोत. कोणी नडला तर त्याला तोडणारच असे जोरजोराने ओरडून दहशत केली व त्यानंतर ते सर्वजण गाडीवर बसून तेथून निघून गेले. त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २७७/२०२३ भादवि कलम ३०७,३२३,५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७, मोका कायदा कलम ३(१) (ii),३(२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हया मध्ये सनी जाधव हा गुन्हा झाले पासुन २ महिने फरार होता.
सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर हे करीत आहेत.सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील,सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, सागर सुतकर, बजरंग पवार, विशाल वाघ नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे येथे हजर असताना मोक्का मध्ये पाहिजे असलेला टोळी प्रमुख सराईत गुन्हेगार सनी जाधव याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत फरार असलेला आरोपी हा कात्रज येथे राजस सोसायटी चौकातील गणपती मंदिरा जवळ मित्र भेटण्यासाठी येणार म्हणुन वाट पाहत थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पो उपनिरी. राहुल खंडाळे व अंमलदार यांची टीम तयार करुन बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सनी शंकर जाधव वय २६ वर्षे रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर १०, माताजी सुपर मार्केट शेजारी अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे असे सांगितले असुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बबलू कोठारी, सलमान शेख यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.