हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सुस रोड येथील हायवेवर अनाधिकृत दुकानांवर मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास चालू केले होते अर्ध्या दुकानांवर कारवाई केल्यानंतर अचानक पणे कारवाई बंद करण्यात आली होती याच मुद्यावरुन स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या बांधकाम विकास वरती टीका व आरोप झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही अनाधिकृत दुकानांवर कारवाई चालू असताना अचानक कारवाई का थांबवण्यात आली त्यामुळे पुणेकरांच्या नजरा खिळल्या आहेत.
कारवाई चालू असताना मशीन बंद पडल्यामुळे कारवाई थांबवण्यात आली आहे असे पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास विभाग येथील दबंग अधिकारी श्री.सुनील कदम ( उप अभियंता बांधकाम विकास झोन क्रमांक – ६ ) यांनी आपली प्रतिक्रिया हिंदजागर प्रतिनिधींना दिली.मात्र यापेक्षा मोठ मोठ्या कारवाया पुणे शहरातील अवैद्य बांधकामांवर करून दाखवणाऱ्या व कुठल्याही दबावाला बळी न पडणाऱ्या श्री.कदम मात्र यावेळेस थंड दिसले आहे. श्री.बिपिन शिंदे ( कार्यकारी अभियंता बांधकाम विकास झोन क्रमांक – ६ ) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो व नंतर त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याने मंत्रालयातून पुणे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे बोलले जात आहे त्यामुळे ही कारवाई थांबवण्यात आली आहे !!! आता यापुढे कारवाई होणार की नाही याचा मात्र मोठा प्रश्न जनतेसमोर आहे !! कारवाई अर्धवट सोडल्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर जनतेच्या टीकेला सामोरे जावं लागत आहे ….
एचईएमआरएलने तक्रारी दाखल केल्यामुळे चौकशी सुरू झाली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास झोन क्रमांक – ६ , येथील अधिकारी यांनी या अगोदर या बेकायदेशीर दुकानधारकांना पालिकेच्या नियमानुसार नोटीस दिली होती व त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली होती मात्र नोटीस सर्व दुकानदारांना दिली असतानाच अर्ध्याच दुकानदारांवरती कारवाई झाली आणि बाकीच्या दुकानदारांना नोटीस देऊन सुद्धा अभय देण्यात आले आहे सदर कारवाई चालू असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पालिकेच्या अधिकाऱ्याला फोन आला व कारवाई थांबवण्यात आली आहे या आधी सुद्धा अनेक लोकांनी पुणे महानगरपालिकेकडे या अनधिकृत दुकान बाबत तक्रार केली होती पण पुणे महानगरपालिकेचे तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे.सामान्यांच्या तक्रारींकडे फारशा गांभीर्याने न पाहणाऱ्या मनपा प्रशासनाकडून मंत्री, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या तक्रारी, निवेदनेही बेदखल केली जात असल्याचे उघड झाले व होत आहे .छाननी न करता तक्रारी निकाली काढल्या जातात. शिवाय, त्या पुन्हा खुल्या न होण्यासाठी पळवाटा शोधल्या जात आहेत . ही कारवाई करत असताना कारवाई क्रेन, गॅस कटर, ब्रेकर, इतक्या मोठ्या प्रमाणात मशिनरी असताना सुद्धा कारवाई अर्धीच करण्यात आली तसेच 15 पोलीस कर्मचारी, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, सुनील कदम, उपअभियंता राहुल रसाळे सर्व अधिकारी कारवाईच्या वेळेस उपस्थित असताना कारवाई अर्ध्यातच थांबवण्यात आली याचाच अर्थ की अधिकाऱ्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले !!! हिंदजागर न्यूज याचा मात्र पाठपुरावा करणार.
— श्री.गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज , पुणे )