हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – पुणे शहरात जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपींना शिवाजीनगर पोलिसानी सहा तासात अटक करून गुन्हयातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी केले जेरबंद
फिर्यादी सोनाली प्रशांत काकडे (वय-३०, व्यवसाय- नर्स, रा- दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे) यांनी १६/१२/२०२३ रोजी तक्रार दिली की, ‘मनपा बस स्टँड येथून पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे २०-२५ वर्षांचे दोन अनोळखींनी येवून त्यांचे हातातील काळी पर्स बळजबरीने हिसकावुन चोरी करुन नेली” म्हणून त्याबाबत शिवाजीगनर पो.स्टे गु.र.नं. २५४ / २०२३, भा. द. वि. कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.सदर दाखल गुन्हयातील नमुद अनोळखींचा तपास चालू असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी सीसीटीव्ही फुटेजचे आधारे व त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की १५/१२/२०२३ रोजी मनपा येथे महिलेला लुटणारे अनोळखी हे जुनी कामगार पुतळा वसाहत, शिवाजीनगर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानुसार व त्याची खात्री करुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना सांगुन त्यांचे आदेशाप्रमाणे व सहा. पोलिस आयुक्त वसंत कुवर, संदीपसिंह गिल्ल, पोलिस उप-आयुक्त परि-२, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रा. विभागाचे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे यांनी जुनी कामगार पुतळा वसाहत येथील पुलाचे मागे पुढे सापळा रचला.
सदर गुन्हयाचा कौशल्यपर्ण तपास करुन गुन्हा दाखल झाल्यापासुन सात तासाच्या आत आरोपी पकडून त्यांना गुन्हयात अटक केली व गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मुद्देमाल व वापरलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच नमुद गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन तरडे हे करीत आहेत.
आदित्य विजय शिंदे (वय-२१ वर्षे, रा-करपे वाडा, सोमवारपेठ, पुणे) व गणेश चंद्रकांत कवडे (वय-१९ वर्षे रा-सदानंदनगर, तिसरा मजला, फ्लॅट नं- ३२५, मंगळवार पेठ, पुणे) दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडे सदर दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील वापरलेली स्कुटर ही सुध्दा आरोपींकडुन जप्त करुन हस्तगत करण्यात आली आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे )