हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.राष्ट्रवादीच्या या तीन खासदारांसह माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
13 डिसेंबरला चार जणांनी संसद परिसरात जात धुमाकूळ घातला. यातील दोन तरूणांनी लोकसभेत जात प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात. त्या बाकांवर उडी मारली. या दोघांनी लोकसभेत धुडगूस घातला. या तरूणांच्या बुटांमधून पिवळ्या रंगाचा धूर निघाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणी चौकशी केली जावी आणि सरकारच्या बाजूने ऑफिशिअल स्टेटमेंट समोर यावं, यासाठी संसदेत विरोधक आवाज उठवत आहेत. याच कारणामुळे मागच्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित केलं जात आहे. लोकसभेत झालेल्या झालेल्या गोंधळानंतर देशभरातून संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला. सहाजिकच विरोधी पक्षातील खासदारांनीही हाच सवाल सरकारला विचारला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
1. व्ही. वैथिलिंगम2. गुरजीत सिंग औंजला3. सुप्रोया सुले4. एसएस.पलानिमनिकम5. अदूर प्रकाश6. अब्दुल समद7. मनीष तिवारी8. प्रद्युत बोर्डोलोई9. गिरधारी यादव10. गीता कोरा11. फ्रान्सिस्को सारादिना12. एस. जगतरक्षक13. एस.आर. पार्थिवन14. फारुख अब्दुल्ला15. ज्योत्सना महंत16. A. गणेशमूर्ती17. माला रॉय18. पी. वेलुसामी19. ए.चेल्लाकुमार20. शशी थरूर21. कार्ती चिदंबरम22. सुदीप बंदोपाध्याय 23. डिंपल यादव24. हसनानीन मसूदी25. डॅनिश अली26. खलीलुर रहमान27. राजीव रंजन सिंह28. DNV. सेंथिल कुमार29. संतोष कुमार30. दुलाल चंद्र गोस्वामी31. रवनीत सिंग बिट्टू32. दिनेश यादव33. के सुधाकरन34. मोहम्मद सादिक35. एमके. विष्णुप्रसाद36. पीपी मोहम्मद फैजल37. सजदा अहमद38. जसवीर सिंग गिल39. महाबली सिंग40. अमोल कोल्हे41. सुशील कुमार रिंकू42. सुनील कुमार सिंग43. एसडी हसन 44. एम. दनुषकुमार45. प्रतिभा सिंह46. थोल थिरुमलवन47. चंद्रेश्वर प्रसाद48. आलोक कुमार सुमन49. दिलीश्वर कामैत. (आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावं )
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर प्रतिनिधी )