हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1 चे 10 रुग्ण झालेत. बुधवारी राज्यात 37 नवीन रुग्णांचं निदान झालं. तर, राज्यात दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. JN1 व्हेरियंटचे 10 रुग्ण सापडले आहेत. ठाण्यात 5, पुण्यात 3, सिंधुदुर्गात 1 तर अकोल्यात नव्या व्हेरियंटचा एक रुग्ण सापडला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. देशात कोरोना व्हायरसचे 628 नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक रुग्ण नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याचं समोर आलं आहे. यामुळे सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4054 झाली आहे, या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
मागील ३ दिवसांमध्ये घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेले गोखलेनगर ३ , वडारवाडी ३, पांडवनगर हेलकम येथे ३ रुग्णांची डॉक्टर होमीयो बाबा हॉस्पिटल येथे अँटीजेंटिस्ट पॉझिटिव्ह असल्याची नोंद आहे सध्या सर्वांना होम क्वारंटाईन केले आहे व प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आवाहन केलेला आहे की मास्कचा वापर करा व घाबरून जाऊ नये प्रशासन आपल्याबरोबर आहे कुठलाही प्रकारचा त्रास होत असेल तर त्वरित जवळीक पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा – डॉ.गजानन पवार ( आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका, पुणे )
WHO चे म्हणणे काय आहे ?कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट जेएन 1 ला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’च्या यादीत टाकले आहे.वाढत्या थंडीच्या दिवसात ‘जेएन.1’व्हेरिएंटच्या संक्रमणाचा धोका बळावला आहे. परंतु या व्हेरिएंटमुळे लोकांना फारसे नुकसान होणार नाही असंही WHO ने स्पष्ट सांगितले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जेएन 1 आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्या अस्तित्वात असलेली व्हॅक्सिन यापासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्याचसोबत WHO ने लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, लोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच शक्यतोवर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा. आरोग्य कर्मचारी आणि मेडिकल संबंधित लोकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करावे. पीपीई किट घालून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करा. व्हेंटिलेटरची सुविधा गरजेनुसार उपलब्ध करून ठेवा असं सांगण्यात आले आहे.
—- गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )