हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुण्यात होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर जोरदार हथोडा टाकणारी मोहीम महापालिकेने सुरु ठेवली असून वाहतूक समस्या ,प्रदूषण आणि बकालपणा वाढवून करोडोची तुंबडी भरणाऱ्या तथाकथित बिल्डर आणि त्यांना साथ देणाऱ्या ग्राहक वर्गाला पुन्हा एकदा इशारा देणारी कारवाई केली आहे.जुन्या शहरालगतच्या उपनगरात काही राजकीय नेते, कार्यकर्ते नामी बेनामी बिल्डर बनून अशी बेकायदा बांधकामे करत असून माहिती असून नागरिकांनी ती खरेदी करू नयेत ,अन्यथा त्यांना साथ देणारे त्यांच्या एवढेच दोषी ठरतात पण कारवाईत मात्र ग्राहकांचे जास्त नुकसान होते हे लक्षात घेऊनच खरेदी करावी असे आवाहन महापालिकेने पुन्हा एकदा केले आहे.पुणे महानगरपालिका झोन क्र.२ मधील मौजे आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं.४३ व स.नं.२५ आणि व आंबेगाव स.नं.१० येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन एकूण सुमारे ४७६६४ चौ.फुट क्षेत्र मोकळे करणेत आले..
पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.२ मधील आंबेगाव बु. येथे विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली तसेच पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.६ मधील सुस रोड येथील बेंगलोर हायवे वरील बेकायदेशीर दुकानांवर अर्धवट केलेली कारवाई पूर्ण कधी होणार ??? बंद पडलेली मशीन चालू कधी होणार ??? कारवाईचा बडगा फक्त सामान्य लोकांवरतीच का ??? राजकीय नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई कधी ??? पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.६ यांच्या अतिरेक असलेल्या अनेक ठिकाणी च्या पुराव्यासहित तक्रारी अर्जावरती कारवाई कधी ??? कारवाई न करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का ??? कारवाई फक्त निवडक लोकांवरती झोपणार का ???? का यामध्ये मोठ्या प्रकारे अर्थपूर्ण व्यवहार होत आहे का ??? असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे !!!! पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.६ येथील अधिकारी वरील प्रश्नांवर उत्तर देणार का ???
आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं. ४३ व स.नं. २५ येथे २५ महाराष्ट्र महापालिका कलम ४७८ (१), २६० (अे) (अे) (बी) व कलम ५३ (१) (अे) अन्वये नोटीस देऊन विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.सदरच्या कारवाईमध्ये आंबेगाव बु. (जुनी हद्द) मधील रोहन ओदेल व इतर यांचे ३०० चौ. फुट, एस.एम.पवार व इतर यांचे ९०० चौ. फुट, उदित सिंग व इतर यांचे ५०० चौ. फुट, तारू राजेंद्र गणपत यांचे ६८४ चौ., विलास कोकरे व इतर यांचे १५० चौ. विकास चव्हाणव इतर यांचे ८० चौ. फुट आणि आंबेगाव (बु.) स.नं.१० येथील अथर्व डेव्ह. व इतर यांचे ४३५० चौ. फुट, साई गणेश डेव्ह. व इतर यांचे ४३०० चौ. फुट, श्रावणी डेव्ह. व इतर यांचे ४२०० चौ. फुट, आर एल चोरगे व इतर यांचे ४२५० चौ. फुट, श्री डेव्ह. व इतर यांचे ४२०० चौ. फुट, साईनाथ डेव्ह. व इतर यांचे ४३५० चौ. फुट, समर्थ डेव्ह. व इतर यांचे ४४५० चौ. फुट, गवळी व इतर यांचे ४५०० चौ. फुट, मौर्य डेव्ह. व इतर यांचे ८३०० चौ. फुट, गुरुदत्त डेव्ह. यांचे २१५० चौ. फुट, असे एकूण ४७६६४ चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.सदरची कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर,जॉ क्रशर,ब्रेकर, इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.