हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झालेली दिसते.बुलेट व एक्टिवा गाडयांवर हातामध्ये पिस्टलसारखे हत्यार, कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या घेवुन बेकायदेशीर एकत्र येवुन ते हवेत फिरवुन आजुबाजुच्या राहणारे लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांवरती वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांचेकडे असलेल्या बियरच्या बाटल्या रस्त्यावर फोडुन, रस्त्याच्या कडेला असलेली रिक्षा व वेस्पा गाडी कोयत्याने फोडुन नुकसान करुन माझे खिशातील पैसे जबरदस्तीने काढुन घेवुन धमकी देवुन व कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली आहे अशा मजकुरची तक्रार दाखल केली.
सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि. अनिरुद् सावर्डे यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना तात्काळ सदरचे गुन्हयातील आरोपीची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे पोउपनि सचिन चव्हाण व पोउपनि. अनिरुद् सावर्डे यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा दाखल होताच अवघ्या ०६ तासाचे आत एकुण १२ आरोपींना अटक केली त्यापैकी ०८ आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींची पोलीस कोठडी मंजुर करुन घेणेकरीता आरोपींना मे. कोर्टासमोर हजर केले असुन पुढील तपास सपोनि गायकवाड हे करीत आहेत.
— गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )