हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याला आता ड्रग्जने विळखा घातल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या चार दिवसात पुण्यामध्ये हजारो कोटींचे मेफेड्रॉन ड्रग्ज सापडले असून त्याचे जाळे हे दिल्लीपर्यंत पसरल्याचं दिसून आलंय.पोलीस आता या प्रकरणी वेगवेगळ्या शहरात कारवाई करत असून अजूनही मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासंबंधित सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
भारतात मिळणाऱ्या ड्रग्जचे प्रकार – 1) अल्प्रोझोलम (कुत्ता गोली) 2) मेफेड्रॉन (एमडीएमए/ एक्सटसी / म्याऊ-म्याऊ / पार्टी ड्रग्ज) 3) कोकेनहेरॉईन (ब्राऊन शुगर) 4) चरसगांजा (कॅनाबिस) 5) भांग (कॅनाबिस)अफू (ओपियॉईड)
ड्रग्ज घेणाऱ्यांची लक्षणे – 1) व्यक्तीच्या वागण्यात बदल. 2) अभ्यास, खेळात, दैनंदिन कामांमध्ये लक्ष न लागणं. 3) घरात इंजेक्शन, सिरींज आढळणे 4).डोळे लाल आणि निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. 5) बोलताना अडखळणे, उभे राहिल्यावर तोल जाणे. 6) सतत नैराश्य, तणावात असणे, भूक मंदावणे 7) .निद्रानाश, स्मरणशक्तीत घट, 8) आक्रमकता, भास होणं अशी लक्षणं.फुफ्फुस आणि इतर आजारांत वाढ.
राज्यात ड्रग्जचा वाढता विळखा – 1) ओपियॉईड, कॅनाबीसचं व्यसन असणाऱ्यांच्या संख्येत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये.2) धूर, वाफ किंवा एरोसोल स्प्रेच्या माध्यमातून किंवा तोंडावाटे घेतलं जातं.3) इन्हेल किंवा इंजेक्शनद्वारे सेवन केले जाणारे अंमली पदार्थ.4) सिडेटिव्ज किंवा वेदना शामक औषधं.5) गांजा थेट मेंदूवर आणि मानसिकतेवर परिणाम करतो.6) आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, ताणतणाव आणि मानसिक आजारांत व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक.7) अंमली पदार्थांची सहज उपलब्धता व्यसनाधीनता वाढण्यास कारणीभूत.
व्यसनांच्या विळख्यातून मार्ग कसा काढणार – 1) मोहात पडू नका.2) चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा पुरस्कार करा.3) विशेषतः लहान मुला-मुलींवर नीट लक्ष ठेवणं गरजेचं.
ड्रग्ज घेतल्यास काय आहे शिक्षा – 1) भारतात ड्रग्जचं सेवन गंभीर गुन्हा 2) ड्रग्ज बाळगल्यास किंवा सेवन केल्यास 10 ते 20 वर्षांची शिक्षा.3) किमान 1 लाख रुपयांचा दंड.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण कुठे थंड होतं ना होतं. तोच आता आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा पुणे शहरात झाला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आता या ड्रग्ज प्रकरणावरून सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.मी ललित पाटील प्रकरणाबाबत वारंवार पोलिसांशी बोलत आलो आहे. तरीदेखील राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास पूर्णपणे केलेला नाही. या प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांनी ज्या पद्धतीने ललित पाटील याला ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणामधील बाकीच्या लोकांना अटक करण्यात आली. मात्र, संजीव ठाकूर यांना सरकारने पाठीशी घालत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.या प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित खात्याचे मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांना पाठवला होता. मात्र, या प्रकरणांमध्ये सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहे, हे स्पष्ट झाला असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. सध्याचे सरकार हे याच संस्कृतीला पाठिंबा देत असून, यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत आहेत.ललित पाटील प्रकरणादरम्यान मी पोलिसांना ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याच्या शक्यतेबाबत कल्पना दिली होती. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र पंजाब नंतर ज्या अमली पदार्थामुळे व्यसनाधीन होत असल्याबाबतची कल्पना पोलिसांना दिली होती. हे ड्रग्ज रॅकेट सोमवार पेठपर्यंत पोहोचले असून, एक नाहीतर अनेक ललित पाटील यामध्ये सक्रिय आहेत. पुणे शहरामध्ये पब संस्कृती वाढत असून, हे पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे बनले आहेत. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोलवर रुजली असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. इतके मोठे रॅकेट पुणे परिसरामध्ये सुरू असताना याचा साधा सुगावा पोलिसांना न लागवा हे पोलिसांचे अपयश असून, पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याचं धंगेकर म्हणाले.
हिंदजागर न्यूज ब्युरो स्पेशल रिपोर्ट , पुणे