हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – माजी खासदार नीलेश राणे यांच्या नावे असलेल्या शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकतकर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेने मंगळवारी (दि.२७) टाळे ठोकले.नीलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. महापालिकेने अनेक वेळा नोटीस देऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या करसंकलन विभागाने जोरदार कारवाई करून ही मिळकत सील केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या मिळकतीची साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी थकली होती.महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे. शंभर टक्के करवसुलीसाठी महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे. ही मोहीम राबविताना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या नव्हे तर राजकीय बड्या व्यक्तींच्यादेखील मिळकती सील केल्या जातील, असा संदेश महापालिकेने राणे यांची मिळकत सील करून दिला असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.मात्र ही मिळकत सील करताना मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. इतर ठिकाणी साधी कारवाई केली तरी मोठा गाजावाजा करत माहिती प्रसिद्ध केली जाते. परंतु राणे यांची मिळकत सील केल्याची माहिती प्रसिद्ध होऊ नये, अशी भूमिकाच या विभागाची होती काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर राणे यांची मिळकत जप्त केल्याची कबुली विभागाच्या वरिष्ठांनी दिली. राणे यांच्या मिळकतीचा थकबाकी मिळकतकर भरावा, याबाबत महापालिकेकडून नोटिसा बजावूनही हा कर भरला जात नव्हता. मात्र, अखेर महापालिकेने तीन मजल्यावरील राणे यांची मिळकत सील केली आहे.
याच भागामध्ये ” Deccan-8 ” नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलचे रूफ टॉप वरती बेकादेशीर रित्या हुक्का बार चालू केले गेले आहे पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाला अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मात्र यावरती दुर्लक्ष करीत आहे . केंद्रीय मंत्र्यांपेक्षा स्थानिक यंत्रणा या हॉटेल धारकाला मदत करत असल्याबाबतची चर्चा आहे . या हॉटेलच्या जवळीक अनेक महाविद्यालय आहेत व त्यामध्ये तरुण पिडीला व्यसनाधीन व्हायला मदत होत असल्याचा आरोप होत आहे. पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ड्रग साठा पकडले जात आहेत तसेच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्तांनी हक्कावरती बंदी आणली असताना सुद्धा या हॉटेलमध्ये मात्र राजरोसपणे हुक्का पार्लर चालू आहे व त्यावरती पोलीस प्रशासन सुद्धा काही बोलायला तयार नाही एक स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी यामध्ये सहभागी असल्याचे बोलले जात आहे . येत्या शुक्रवारी याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त यांना तक्रारदार पुरावे देऊन जाब विचारणार आहे व कारवाईसाठी धरणे आंदोलन करणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर टाकला जात होता
दबावनीलेश राणे यांच्यावर मिळकतकराची थकबाकी थकली होती. ३ कोटी ७७ लाख ५३ हजार ८०३ रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांची काही प्रमाणात थकबाकी थकली तरी त्याला नोटीस देऊन दंड भरून वसूल केली जाते. राजकीय व्यक्तीला नोटीस देताना दबाव आणला जात होता. त्यामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती. काही महिन्यांपूर्वी पालिकेने नोटीस बजावल्यानंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर, पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, मंगळवारी अखेर पालिकेने या मिळकतीला टाळे ठोकले असून थकबाकीपोटी ती सील केली आहे. करआकारणी व करसंकलन विभागाने मंगळवारी एकूण १६ मिळकती जप्त करून आठ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली.
गणेश जोशी ( हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे )