हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – गोखलेनगर, जनवाडी परिसरात मद्यपींचा उपद्रव वाढला असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या दारु विक्री केंद्राच्या बाहेरच दुचाकीवर बसून किंवा अन्य वाहनांचा आडोसा घेऊन रस्त्यावरच मद्यपी मद्यपान करत असल्याचे दिसून येते.
वैदुवाडी स्मशानभूमी , ओम साई मंजू मित्र मंडळाचे ग्राउंड , दिनराज मित्र मंडळ कडे जाणारी गल्लीमधील रिक्षामध्ये , गोखलेनगर च्या ग्राउंड मध्ये मद्यपींचा अड्डा बनली आहे. वेताळबाबा चौकामध्ये असलेले ” Trinity Wines ” वाईन शॉपमधून मद्यपी दारू घेतात आणि फुटपाथ व रिक्षात किंवा दुचाकीवर बसून पितात हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो मेन रोडवर अशा ठिकाणी बेकायदेशीर अंड्याची भुर्जी ची गाडी म्हणजेच या मद्यपींयां साठी मोठे वरदान आहे या बेकायदेशीर अंडा भुर्जी गाडी बाबत स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे तक्रारी करून सुद्धा अतिक्रमण विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
कुसळकर पुतळा चौकानजीक जनवाडी पोलिस चौकी परिसरातही हा प्रकार सर्सास घडताना दिसतो. याकडेही पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जनवाडी पोलिस चौकी परिसरात तर 300 ते 400 मीटरवर अंतरावर ही चौकी असूनही रिक्षात बसून व फुटपाथवर दारू पिली जाते व बेकायदेशीर अंडा भुर्जी गाडी चालवले जाते यावर नियंत्रण नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
मद्यपींकडून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपशब्द वापरणे, जाणीवपूर्कक खोडी काढणे अशा घटना वारंवार घडत असतात. अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खचही पडल्याचे दिसून येते. असे प्रकार सातत्याने होत असल्याचे ओरड नागरिकांतून आहे. मात्र, वादाचा विषय असल्याने नागरिक बोलणे टाळत असल्याचे दिसून येते. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून वरील सर्व ठिकाणी वारंवार पोलीस गस्त करून काहीतरी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे..
गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )