हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – नागपूरच्या येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या धर्तीवर आता पुण्यातही ‘एम्स’ हाॅस्पिटलची उभारणी केली जाणार असल्याची घाेषणा राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केली आहे.हे रुग्णालय औंध जिल्हा रुग्णालयाच्या जागेत प्रस्तावित आहे. त्यामुळे पुणेकरांना आता स्वस्त दरात टर्शरी केअरची सेवा मिळण्यास मदत हाेणार आहे.जिल्हा रुग्णालय, औंध येथील ८५ एकर जागा वर्षानुवर्षे विनावापर पडून आहे. या ठिकाणी हे हाॅस्पिटल हाेणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. एम्स हाॅस्पिटल किती जागेत असेल, ते कधी अस्तित्त्वात येईल, याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे त्याचा आराखडा कसा असेल, याबाबत संदिग्धता आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या धर्तीवर औंध येथे ८०० बेड्सच्या क्षमतेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सुमारे दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार शिरोळे यांनी दिले होते. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ससून रुग्णालयाला अजून एक सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, असा या निवेदनातील मागणीमागे उद्देश होता.औंध येथे ८४ एकर जागा विनावापर पडून असून त्याजागी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी केली होती आणि त्याच जागी एम्स हॉस्पिटल होत आहे, ही बाब स्वागतार्ह असल्याचेही आमदार शिरोळे यांनी म्हटले आहे.या घोषणेचे स्वागत असून, त्यामुळे ससून रूग्णालयावरील भार हलका होईल अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.
वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, वाशिम, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय रुग्णालय तसेच ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जळगाव, लातूर, बारामती, गोंदिया, नंदूरबार, मिरज इथे संलग्न १०० विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूरच्या धर्तीवर औंध पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे. राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून यामध्ये वार्षिक १ लाख रुपये प्रतिकुटुंबावरून ५ लाख रुपये वार्षिक अशी करण्यात आली आहे. अंगिकृत रुग्णालयांची संख्या १ हजारावरून १९०० करण्यात आली.
गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )