हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी पुणे – जांभूळवाडी रोड दत्तनगर चक्रधर शाळेसमोरील पाण्याचे वॉल वारंवार पाणी गळती चालू असते. पालिकेने शक्कल लावली गोल भोवती लोखंडी पाईप उभा केला. संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील पाच दिवसा पूर्वी काम झाले पण काम असं केलं की रस्त्याच्या १/२ फूट लोखंडी पाईप वरती आल्यामुळे तिथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या जीवाशी काही देणं घेणं नाही असे या कामावरून दिसून येत आहे. आम आदमी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष अनुसूचित जाती प्रशांत कांबळे यांनी नागरिकांना आव्हान केलेला आहे. या लोखंडी पाईपामुळे काही अपघात झाल्यास जीवित हानी झाल्यास पालिके विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करावी असे आव्हान करण्यात आले आहेत.