हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी पुणे – नवयान धम्मचक्र प्रवर्तन महाविहार , जनवडी येथे आज महाकरुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सामुदाईक वंदना व व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. प्रशांत रणदिवे व जाधवसर यांनी भारतीय समजाला तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची आवश्यकता या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मिलिंद शितोळे यांनी भूषविले.