हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – मागील काही दिवसापासून राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे. राज्यसभेची उमेदवारी न दिल्याने छगन भुजबळ पुन्हा नाराज झाल्याचे समजत आहे. अशातच आता समता परिषदेने देखील भुजबळांनी वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरावा अशी मागणी केली आहे.त्यामुळे छगन भुजबळ लवकरच वेगळा निर्णय घेणार का ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. अशातच आता छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजित पवार गटातील आमदार बंड करणार आहे. असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी केलाय.
लोकसभेनंतर राज्यसभेत देखील भुजबळांना अजित पवार गटाकडून डावलण्यात आलं. त्यातच आता मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादी सोबत असल्याचं विधान भुजबळांनी केलं. त्यावरून राज्यात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. यातच छगन भुजबळ अनुभवी नेते असून त्यांना काही अंदाज आला असेल. त्यामुळएच त्यांनी तसं विधान केलं असावं. फक्त छगन भुजबळ नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडणार आहेत. अधिवेशनामध्ये निधी घेतली आणि नंतर अजितदादा गटाला रामराम करतील. असं विधान आता रोहित पवारांनी केलंय.दरम्यान, पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, महायुतीतील सर्व नेते आपापलाच विचार करत आहेत. जनतेचं यांना काही पडलेलं नाहीय. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील आमदारांना भीती वाटायला लागली आहे. आता आपलं काय होणार ? असं त्यांना वाटतंय म्हणून पराभावाचं खापर कुणाच्या माथी फोडायचं. तर कधी भुजबळ साहेबांचे नाव घ्यायचे तर कधी अजित पवारांंचं नाव घ्यायचं सुरू आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.