हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुणे तिथे काय उणे…पुण्यात कधी काय घडेल आणि काय प्रकार समोर येईल काही सांगू शकत नाही. अनेकदा अजब-गजब घटना समोर येतात. यामध्ये आणखी भर पडलीय. आता पुण्यातून चोरांचा फिल्मी ड्रामा पहायला मिळाला.
पुण्यात तीन चोर चक्क पार्किंगमध्ये लपले आणि चोरांना पकडण्यासाठी फायर ब्रिगेड पोलीस आणि नागरिकरांची गर्दी जमली. पुण्यात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पुण्यातील JM रोड म्हणजेच सदगुरु जंगली महाराज रस्त्यावर ही घटना घडली. सदगुरु जंगली महाराज रस्त्यावर मेकॅनिकल पार्किंग मध्ये 3 चोर वरती लपले आहेत. चोरांना पकडण्यासाठी फायर ब्रिगेड पोलीस पार्किंगच्या खाली असून गेल्या दोन ते तीन तास हा सगळा नाट्यमय प्रकार सुरू होता.
चोरांना खाली येण्याची विनंती पोलीस करत आहेत. परंतु चोर घाबरून खाली येत नाही. यामुळे लोकही याठिकाणी जमा झालेत. मेकॅनिकल पार्किंग मधील लाखो रुपयेचे लोखंड कॉपर व वायर चोरीला गेले असून आता चोरांच्या मुस्क्या पोलिसांनी अवल्या.
Repoter – विनोद वाघमारे