हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून १ कोटी ६० लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ झाला. पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, गुंजाळवाडी भागातील कामांचे भूमीपूजन करण्यात आले.तसेच नुकतेच औंध मधील समस्यांबाबत नागरिकांशी शिरोळे यांनी संवाद देखील साधला.
भूमिपूजन कार्यक्रमस दत्ता खाडे, गणेश बगाडे, अपर्णा कुऱ्हाडे, किरण ओरसे , शैलेश बडदे, हेमंत डाबी, रामभाऊ धोत्रे, सागर धोत्रे, रमेश भंडारी, बाळासाहेब दारवटकर,दत्ता घोगल्लू, सुजित गोटेकर,किरण बदामी, लक्ष्मण लोखंडे, दत्तु धोत्रे, सुनिता श्रीधर, मंगेश माने, राजेश धोत्रे, अनिकेत जाधव, अमृता म्हेत्रे, संजय जगताप, रोहित श्रीधर, ईश्वर बनपट्टे, केतन जोशी, अनिल पाटोळे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वडारवाडी मारुती मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, वडार हौसिंग सोसायटी येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, पीएमसी कॉलनी पांडवनगर येथे सीमाभिंत बांधणे, पांडवनगर येथील अजिंक्यतारा सोसायटी व ओंकार सोसायटी बाहेर नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, कुसाळकर बंगला वडारवाडी येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, हेल्थ कॅम्प पांडवनगर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, गुंजाळवाडी येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, पांडवनगर येथील श्री मरगम्मा देवी बाल क्रीडांगण विकसित करणे, हेल्थ कॅम्प पांडवनगर येथे नळकोंडे दुरुस्त करणे, शिवांजली एसआरए सोसायटी पांडवनगर येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.
औंधमधील नागरिकांशी संवाद
बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावरील कचरा आदी समस्यांबाबत औंध मधील नागरिकांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका अधिकारी यांनी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत विविध हौसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. औंध बोपोडी परिसरातील बंद पथदिवे, रस्त्यांवर टाकला जाणारा राडारोडा, फूटपाथ वरील अनधिकृत टपऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दारू पिणाऱ्यावर कारवाई व्हावी, रस्त्यांवर आलेले होर्डिंग्ज आदी समस्या नागरिकांनी मांडल्या. त्या सोडविण्याच्या दिशेने चर्चा उपयुक्त झाली.
यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सौरभ कुंडलीक, संजय कांबळे, सचिन मानवतकर, अभिजित गायकवाड, सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सुभाष पाडळे, सागर मदने, विजय जाधव, महापालिकेचे अभियंता लांडे आदी उपस्थित होते.
Repoter – प्रदीप कांबळे